संगमनेर, ( प्रतिनिधी) – शहरातील एका युनिसेक्स सलोनमध्ये महिला फेशियल रूममध्ये असताना फेशियलचे प्रॉडक्ट घेण्यासाठी म्हणून गेलेल्या एका व्यक्तीने तेथील महिलेच्या गालावर हात फिरून “माझ्याशी लवशिप ठेवशील का”? असे म्हणून विनयभंग केला. यापकरणी तिघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अविनाश उगले हा फेशियलचे प्रॉडक्ट घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याने पीडितेच्या उजव्या गालावर हात फिरून “माझ्याशी लवशिप ठेवशील का?” असे म्हणून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
मंगळवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास पीडित महिला घरी असताना सागर वाकचौरे हा घरी आला . “तुझे कोणते कामाचे पैसे आमच्याकडे राहिले आहेत, तुझे कुठलेही पैसे आमच्याकडे राहिलेले नाहीत”. असे म्हणून तिला व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करू लागले.
अविनाश उगले याने हाताला धरून महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. सागर वाकचौरे व गोकुळ वाघ यांनी पीडितेचा पती व सासरे यांना धक्काबुक्की केली. पीडित महिलेने संगमनेर शहर पोलीस स्टेशन गाठले आणि सागर वाकचौरे, गोकुळ वाघ आणि अविनाश उगले (रा.कळस. ता. अकोले) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.