चिंबळी-खेड तालुक्यात व औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कुरूळी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दिपावली सणाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचारी वर्गांना मिठाई व बोनस वाटप करण्यात आले. सरपंच सचिन कड, माजी सरपंच बाळासाहेब सोनवणे व सर्व सदस्यांच्या वतीने वाटप करून दिपावली व दिवाळीपाडवा तसेच भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.