Bollywood – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा बॉयोपिक सध्या चांगलाच चर्चेत आहे. राजने ‘UT69’ चित्रपटाची घोषणा केली असून, त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात राज कुंद्रा आर्थर रोड तुरुंगात घालवलेल्या त्याच्या कठीण दिवसांचा अनुभव सांगणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तो कैद्यांमध्ये खिन्नपणे बसलेला दिसतो. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी राजने सांगितले की जेव्हा त्याने चित्रपट करण्याची कल्पना मांडली तेव्हा पत्नी शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया काय होती.
राज कुंद्रा गंमतीने म्हणाला, ‘मी चित्रपट बनवतोय हे मी तिला सांगायचे ठरवले तेव्हा ती माझ्यापासून थोडी दूर होती. मला तिच्या आसपास याविषयी बोलायचे नव्हते. मी शिल्पाला सांगितले की माझ्याकडे स्क्रिप्ट आहे आणि मी तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे. एवढं बोलून मी वळलो तेव्हा माझ्या तिने मला चप्पलेने मारले. मला वाटते की, शिल्पाला ही कल्पना थोडी जोखमीची वाटली. कदाचित हा चित्रपट बनणार नाही असे तिला वाटले असेल.
या चित्रपटासाठी राजने शिल्पाला कसे समजावले याबद्दलही त्याने सांगितले. राजच्या म्हणाला, दिग्दर्शक शाहनवाज अलीने चित्रपटाची कथा शिल्पाला सांगितली होती. तो म्हणाला, ‘त्याने अतिशय हुशारीने वर्णन केले होते. शिल्पाने याचा विचार केला आणि मग लक्षात आले की हे चित्र व्यवस्थेविरुद्धच्या कोणत्याही केसबद्दल नाही. ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट आहे असे तिला वाटले. ती साथ देत होती. शिल्पाने मला विचारले, ‘तू अभिनय करशील का?’ मी तिला सांगितले की मी हे करेन कारण मी तुरुंगात जाऊन मेथड अॅक्टिंग केली आहे.’
राज कुंद्राने असेही सांगितले की, शिल्पा शेट्टीला ‘UT69’साठी माझा अभिमान आहे. नुकताच ‘UT69’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये राज कुंद्रा एका पॉर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात जाताना दिसणार आहे. मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात राजचा अनुभव कसा होता हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. त्याला अतिशय निकृष्ट अन्न मिळत होते हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.