नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आपली कारवाई सुरु केली आहे. इथल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या बुरखाधारी लोकांना शोधण्याचे काम सुरु आहे.
Anurag Kashyap, Zoya Akhtar, others lead #MumbaiProtest over #JNUAttack.
Read more here: https://t.co/nnKiiUCf72 pic.twitter.com/LDnlvt4zFi
— NDTV (@ndtv) January 7, 2020
दिल्ली पोलिसांनी मारहाण झालेल्या जेएनयूच्या विद्यार्थी संघाची अध्यक्ष आयेषी घोष हिच्यासह 19 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर्वर रुमची तोडफोड आणि सुरक्षा रक्षकांना मारहाण प्रकरणी आयेषीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
With you students of India. Thank you @MumbaiPolice ??❤️ pic.twitter.com/y9yX2o0UUm
— Dia Mirza (@deespeak) January 6, 2020
याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री यांनी सोशल मीडिया वर संताप व्यक्त करत निषेध केले आहे. दिग्दर्शक विशाल भारद्वाज, अनुराग कश्यम, अनुभव सिन्हा, जोया अख्तर, रीमा कागतीशिवाय अभिनेत्री तापसी पन्नू, दिया मिर्झा, गौहर खान, श्वेता त्रिपाठी, अली फजल, राहुल बोस असे अनेक सेलिब्रिटींनी या हल्ल्याच्या निषेध नोंदवत, आंदोलनात सहभाग नोंदवला. अभिनेत्री ऋचा चड्ढा यावेळी प्लेकार्डसोबत जेएनयू हल्ल्याचा विरोध करताना दिसली.