पुणे – सौरऊर्जा निर्मिती घराच्या छतावर करणाऱ्या ग्राहकांना सरसकट मेटबिलींग बंधनकारक करण्याची महावितरणची मागणी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने फेटाळून लावून नेट मीटरिंग पद्धत कायम ठेवल्याने वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
ग्रीड इंटरॅक्टिव्ह रुफटॉप 2019 मधील नियमानुसार ग्राहकांना नेट बिलींग किंवा नेट मीटरिंग ठरविण्याचे अधिकार ग्राहकांना मिळालेले आहेत. नेट मीटरिंगमुळे घरच्या घरी सौरऊर्जा निर्मिती झाल्यानंतर घरासाठी त्याचा वापर करण्यासोबत अतिरिक्त ऊर्जा नेट मीटरच्या माध्यमातून परत करता येते. या नेट मीटरच्या पद्धतीला विरोध करत सरसकट नेट बिलींग लागू करण्याची मागणी महावितरणने आयोगाकडे केली होती. या पद्धतीविरोधात ग्राहकांमध्येही असंतोष होता. अखेर आयोगाने नेटमीटरची पद्धत कायम ठेवल्याने वीज ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.