Bollywood : अभिनेता अनिल कपूर सध्या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट आणि पोस्ट्समुळे चर्चेत आहे. अनिल कपूरने सर्व पोस्ट डिलीट केल्या आहे. अनिल कपूरने डीपीही काढला. असे अचानक काय घडले याने अभिनेत्याच्या या हालचालीने चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. अनिल कपूरचे इंस्टाग्रामवर ५.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. असे असतानाही त्यांनी ही पोस्ट हटवण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक त्याच्या या हालचालीचा संबंध ‘मिस्टर इंडिया 2’शी जोडत आहेत. या चित्रपटाची घोषणा होणार आहे का..? यावर बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल कपूर इंस्टाग्रामवरून अचानक गायब झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारचे रिपोर्ट्स व्हायरल होऊ लागले आहे. एका सूत्राचे म्हणणे आहे की, ‘अनिल कपूरचे सोशल मीडियावरून अचानक गायब होणे हे ‘मिस्टर इंडिया 2′ च्या सुरुवातीचे संकेत आहे. मिस्टर इंडिया (1987) च्या पात्राप्रमाणे अनिल कपूर देखील सोशल मीडियावरून अचानक गायब झाला आहे.’
अनिल कपूर गायब झाल्याची बातमी आणि ‘मिस्टर इंडिया 2’ व्हायरल झाल्यानंतर, न्यूज पोर्टलने बोनी कपूर यांच्याशीही संवाद साधला. तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘पोस्ट डिलीट केल्याबाबत मला माहिती नाही.’ बोनी कपूर म्हणाले, ‘मला बघू दे. मी अजून ते स्वतः पाहिलेले नाही. पण हो, त्याला काहीतरी दाखवायचे आहे, असे त्याने नमूद केले होते. ‘मिस्टर इंडिया 2’ बद्दल बोनी कपूर म्हणाले, ‘मला वाटत नाही की मी ‘मिस्टर इंडिया 2′ ची घोषणा करू शकेन.’
अनिल कपूर इंस्टाग्रामवरून गायब झाल्याने केवळ चाहतेच आश्चर्यचकित झाले नाहीत, तर खुद्द त्यांची मुलगी सोनम कपूरही आश्चर्यचकित झाली. सोनम कपूरने वडिलांच्या इंस्टाग्राम अकाउंटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आणि विचारले, ‘बाबा?’ अभिनेत्याचे जावई आनंद आहुजानेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली असून काहीतरी नवीन घडणार असल्याची आशा व्यक्त केली आहे.’