मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या स्वतःच्या नावाचा दमदार ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री ‘मृणाल ठाकूर’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. सर्वच स्तरातून मृणालच्या अभिनयाचं कौतुक होत असतं. अभिनय असो वा बोल्ड फोटोशूट मृणालने अनेक आघाडीच्या नायिकांना मागे टाकले आहे.
View this post on Instagram
मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या मृणालचे इंस्टाग्रामवर 3 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. नुकतंच मृणालने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून,
View this post on Instagram
यामध्ये ती प्रचंड बोल्ड दिसत आहे. नेहमीच क्युट आणि सोज्वळ दिसणाऱ्या मृणालनं या फोटो दरम्यान सर्व मर्यादा मोडल्या आहेत. तिचा हा बोल्ड अँड हॉट लूक फॅन्सला तुफान आवडला आहे. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
मृणाल ठाकूरला कुमकुम भाग्य मालिकेतून लोकप्रियता मिळाली. तर, अभिनेता हृतिक रोशन याच्या सुपर 30 चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. नुकतंच मृणालचा धमाका चित्रपट रिलीज झाला असून, आगामी जर्सी चित्रपटात सुद्धा ती मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.