मुंबई – लहानपणी कार्टून्सच्या माध्यमांतून आपल्या मनावर अधिराज्य गाजवणारे एव्हरग्रीन नाव म्हणजे, मिस्टर बीन (Mr. Bean) रोवन अॅटकिंसन या अवलियाच्या अनेक भन्नाट कॉमेडी रिसीज कमालीच्या हिट झाल्या आहेत.
View this post on Instagram
मिस्टर बीनचा मिश्किल अंदाज, टेडी सोबतची केमिस्ट्री, एकटे पण आनंदी जगणे हे अनेकांसाठी आजही एखाद्या थेरपी प्रमाणे काम करतात.
एक शब्दही न उच्चारता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पोट धरून खळखळून हसायला लावणारे मिस्टर बीन यांचा सोशल मीडियावर निधन झाल्याचे म्हटले जात आहे. रोवन यांच्या निधनाच्या चर्चा ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. पण आता या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
View this post on Instagram
अमेरिकेतील एका न्यूज चॅनेलने सोशल मीडियावर रोवन अॅटकिंसन यांचे निधन झाल्याचे म्हटले होते. त्यांनी ट्वीट करत ‘फॉक्स ब्रेकिंग न्यूज, मिस्टर बीन (रोवन अॅटकिंसन) यांचे वयाच्या ५८व्या वर्षी कार अपघातात निधन झाले आहे’ अशी माहिती दिली. पण काही वेळातच त्यांनी ट्वीट डिलिट केले आहे.
दरम्यान, मिस्टर बिन यांनी आपल्या कारकीर्दीत ‘नॉट द नाइन ओ क्लॉक न्यूज’ आणि ‘ब्लॅकॅडर’ या सिरिज मध्ये ‘तसेच 1987 मध्ये ‘बीबीसी रेडिओ 3’ या वाहिनीवर त्यांचा ‘द अॅटकिंसन पिपल’ या विनोदी सीरीज मधून प्रेक्षकांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी अनेक मोठी यशाची शिखरे गाठली.