पाटण (प्रतिनिधी) – पाटण तालुक्यात अनेक वर्ष “बॉबी”चा व्यवसाय करणारा मूळचा तामिळनाडू येथील परंतु पाटण तालुक्याच्या परिसरात आण्णा नावाने परिचित असलेल्या रमण तेवर ऊर्फ आण्णा याच्यावर शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात लोखंडी रोड घालून हल्ला केला. यात गंभीर जखमी झाल्याने रमण तेवर ऊर्फ आण्णाचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पाटणच्या पूर्वेस असणाऱ्या म्हावशी पेठ येथे संत निरंकारी भवनच्या बाजूला “बॉबी” व्यावसायिक रमण तेवर ऊर्फ आण्णाने नव्याने व्यवसाय सुरु केला होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलेही काही दिवस या व्यवसायाला हातभार लावण्यासाठी त्याच्यासोबत राहत होती, तर काही कामगारही त्याच्यासोबत काम करत होते. मात्र, सोमवारी त्याच्या मूळगावी तामिळनाडूत घरगुती कार्यक्रम असल्याने त्याची मुले व पत्नी पाच ते सहा दिवसांपूर्वी गावाला गेले होते.
रविवारी सकाळी गावाला गेलेल्या पत्नीचा फोन रमण तेवर ऊर्फ आण्णाला येत होता. मात्र, तो फोनला प्रतिसाद देत नसल्याने त्याच्या पत्नीने ओळखीच्या दुसऱ्या व्यक्तीस घरी जाऊन रमण तेवर उर्फ आण्णा फोन का उचलत नाही, हे पाहण्यास सांगितले. त्या व्यक्तीस आण्णा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेला आढळून आला. त्यानंतर त्याने तत्काळ ही घटना रमण तेवरच्या पत्नीला व पोलिसांना सांगितली.
शिंदे की ठाकरे? सर्वोच्च न्यायालयात १ ऐवजी ३ ऑगस्टला होणार सुनावणी
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा केला. यावेळी पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी व्यावसायिकाच्या घराच्या आजूबाजूचा परिसर पिंजून काढून काही धागेदोरे मिळतात का याची पाहणी केली. दरम्यान, मृत “बॉबी” व्यावसायिकाच्या कानाच्या पाठीमागील बाजूस डोक्यात दोन गंभीर वार करण्यात आले होते. त्यामुळे जबरी घाव डोक्यात बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अद्याप खुनाचे कारण, संशयित याबद्दल गोपनीयता पाळण्यात आली आहे.
शिंदे गटाकडून राऊतांवरील कारवाईचे समर्थन होत असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र…