नवी दिल्ली – शिवसेनेच्या 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाविरोधात बंड पुकारले. त्यानंतर 12 खासदारदेखील शिंदे गटात सामिल झाले. खासदारांनी बंड पुकारल्यानंतर शिंदे गटाने मूळ शिवसेना पक्ष आमचाच असल्याचा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेला पक्षावरील हक्क सांगण्याबाबत नोटीस बजावली आहे.
या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार होती, मात्र आता ती पुढे ढकलण्यात आली असून आता 3 ऑगस्टला होणार आहे.
“ईडी”ची कारवाई सूडबुद्धीने; कॉंग्रेस संजय राऊत यांच्या पाठीशी
सरन्यायाधीश रमण्णा यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी होणार आहे. प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे किंवा घटनात्मक पीठाकडे जाणार का याचा फैसला आता तीन ऑगस्टला होणार आहे. कोर्टात दोन्ही बाजूंनी शपथपत्र दाखल झालं आहे. कुठल्या घटनात्मक बाबींवर सुनावणी हवी याबाबत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद या दिवशी कोर्ट निश्चित करणार आहे. सोबतच निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती मिळणार का, हेदेखील याच दिवशी समजणार आहे.
राऊत यांच्यावरील ईडी कारवाईवर विचारताच अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं