ढाका : बंगालच्या उपसागरामध्ये बोट बुडून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान 16 रोहिंग्यांचा बुडून मृत्यू झाला झाला. हे रोहिंग्ये निर्वासित बांगलादेशातील होते. प्रमाणापेक्षा अधिक जण बोटीमध्ये बसले होते, त्यामुळे ही लाकडी बोट सेंट मार्टिन बेटाजवळ बुडाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बोटीतून प्रवास करणाऱ्या 14 महिला, एक मूल आणि एका पुरुषाचा मृतदेह तटरक्षक दल, नौदलातील गोताखोर आणि इतर बचावकर्त्यांनी पाण्याबाहेर काढला. बोटीतील काही 62 शरणार्थ्यांना वाचवण्यात यश आले. ही बोट मलेशियाच्या दिशेने जात होती. बांगलादेशातून वेगवेगळ्या ठिकाणांवरून या निर्वासितांना बरोबर घेण्यात आले होते.
मृतदेह जवळच्या शाह पोरीर बेटावर पाठविण्यात आले होते आणि बचावकार्य सुरूच आहे, असे कोक्स बझार येथील अतिरिक्त पोलीस अधिक्षक इक्बाल हुसैन यांनी सांगितले. बेकायदेशीरपणे परदेशात घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असे अपघात वारंवार घडतात.