रसिकशेठ यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत आहोत : शोभाताई धारिवाल
पुणे – रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 1 मार्च रोजी माणिकचंद हाऊस बंगला नं. 64, लेन नं. 3, कोरेगाव पार्क पुणे येथे रक्तदान शिबिर होत आहे.
“रसिकलाल धारिवाल हे त्यांच्या सामाजिक कार्याने अजरामर आहेत. त्यांनी सदैव तळागाळातील तसेच समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला. उद्योग- व्यवसायातून उच्च शिखरावर पोहचूनही समाजाच्या सर्वांगीण विकासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला.
शहरी व ग्रामीण भागांत शाळा महाविद्यालयाची उभारणी असो, पर्यावरण अथवा आरोग्य विषयक प्रकल्पाची उभारणी असो. समाजाला आपला उपयोग कसा होईल, याचाच विचार ते नेहमी करत,’ अशा भावना आर.एम.डी. फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई रसिकलाल धारिवाल यांनी यावेळी व्यक्त केल्या.
दरम्यान, या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन नागरिकांनी रक्तदान करण्यास यावे, असे आवाहनही शोभाताई धारिवाल यांनी यावेळी केले.