पुणे – कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील भाऊ कांबळे यांचा जन्म दिवस 10 सप्टेंबर रोजी असतो. यानिमित्ताने पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक 5 रविवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगदीशजी मुळीक,संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे, पुणे महानगरपालिकेचे सभागृहनेते गणेशजी बिडकर ,पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्रीपाद ढेकणे दिलीप, काळोखे , मतदारसंघाचे अध्यक्ष महेश पुंडे नगरसेविका मंगलाताई मंत्री मनिषाताई लडकत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले या वेळी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, धनराज घोगरे, उमेश गायकवाड,सौ कलिंदाताई पुंडे, दिलीप गिरीमकर, संदीप लडकत, प्रियांका श्रीगिरी, शैलेश बिडकर, तुषार मंत्री, मतदारसंघातील विविध पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 295 रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता पार्टी मतदार संघाचे अध्यक्ष महेश पुंडे सरचिटणीस उमेश शिंदे, संतोष इंदुलकर, विशाल कोंडे ,विशाल दरेकर, सुशांत निगडे, अजिंक्य वाळेकर, शशी पूरम, युवा मोर्चा अध्यक्ष आशिष सुर्वे प्रभाग 19 चे अध्यक्ष सनी आडागळे, कार्यक्रमाचे प्रमुख मंदार पवार, मुकुंद माने, गजानन चव्हाण, महादेव घडसिंग सर्व प्रभाग अध्यक्ष,मंडल पदाधिकारी नगरसेवक यानी केले रक्तदान शिबिर यशस्वी होणे करिता नियोजन केले.