पिंपरी, (प्रतिनिधी) – पुण्यश्लोक श्री राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे ‘एक गाव एक शिवजयंती खराळवाडी २०२४’ निमित्त रविवार दिनांक २४ मार्च २०२४ रोजी आयोजित विनामूल्य महाआरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न झाले.
यावेळी रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. रविवारी (दि.२४) रोजी झालेल्या या शिबिरात २३८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली व काही रुग्णांना पुढच्या उपचारासाठी दवाखान्यात सुविधा उपलब्ध करून देण्याचे देखील नियोजन करण्यात आले.
रक्तदान शिबिरास देखील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सर्व कार्यक्रमासाठी डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल व रक्तपेढीचे मोलाचे सहकार्य लाभले.