आळंदी, (वार्ताहर)– छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नमित्त भव्य रक्तदान शिबिर व विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले आहे आळंदीतील शिवसेना शहर प्रमुख राहुल शेठ चव्हाण यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला.
आळंदी शहरामध्ये विविध ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये व शाळेमध्ये ग्रंथालयामध्ये ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राहुल चव्हाण, सचिन शिंदे, बद्रीनारायण घुगे, राजेश्वर पांपटवार, अरुण कुर्हे, श्रीकांत काकडे, श्रीराज कदम, योगेश कोरडे, रमाकांत शिंदे, नितीन मुळे, दिनेश तांबोळी उपस्थित होते. भारती हॉस्पिटल ब्लड बँक कात्रज पुणे यांच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये बहुसंख्येने रक्तदान देण्यात आले.