मुंबई – जागतिक प्रायव्हेट इक्विटी संस्था असलेला ब्लॅक स्टोन ग्रुप ( Black Stone) भारतामध्ये दरवर्षी किमान दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे या कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले. मात्र भारत सरकारने या क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे.
विलीनीकरणाच्या योजनांना लवकर मंजुरी देणे, सरकारी कंपन्यांचे खासगिकरण करणे आणि व्यावसायिक मतभेद ताबडतोब सोडविण्यासाठी यंत्रणा विकसित करणे यासारख्या सुधारणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अशा प्रकारच्या सुधारणा झाल्या तर ब्लॅक स्टोन सारख्या संस्था भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकतील असे ब्लॅक स्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमित दीक्षित यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.