Indian Premier League 2024 (GT vs PBKS Match 17) : आज IPL 2024 चा 17 वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळला जात आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध पंजाब किंग्जने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
शुभमन गिलच्या नाबाद 89 धावा आणि राहुल तेवतियाच्या नाबाद 23 धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 199 धावसंख्येपर्यत मजल मारली असून पंजाब किंग्जसमोर विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.
Innings Break ‼️
Shubman Gill’s unbeaten 8️⃣9️⃣ helps #GT set a target of 2️⃣0️⃣0️⃣
Will #PBKS reach this target? 🎯
Follow the Match ▶️ https://t.co/0Sy2civoOa#TATAIPL | #GTvPBKS pic.twitter.com/NICJDnQ5ML
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2024
गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने 48 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 89 धावांची खेळी केली. गिलचे शतक हुकले असले तरी त्याने आपल्या कामगिरीने संघाला सावरले. गिलच्या या खेळीच्या जोरावर गुजरातने 199 धावा केल्या. गिल या मोसमात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
राहुल तेवतियाने अवघ्या आठ चेंडूत 23 धावांची नाबाद खेळी खेळली. तेवतियाने 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. याआधी साई सुदर्शनने 19 चेंडूत 6 चौकारसह 33 धावांची तर केन विल्यमसनने 22 चेंडूत 4 चौकारासह 26 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त
ऋद्धिमान साहा 13 चेंडूत 11 धावा करून तर विजय शंकर 10 चेंडूत आठ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
IPL 2024 Viewership : पहिल्या 10 सामन्यांमध्येच IPL 2024 ने तोडले सर्व व्यूअरशिपचे जुने रेकॉर्ड…
पंजाबकडून गोलंदाजीत वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने चार षटकांत 44 धावांत दोन बळी घेतले, तर हरप्रीत ब्रार आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक बळी मिळाला. हरप्रीतने 4 षटकात 33 तर हर्षलने 44 धावा दिल्या.