नवी दिल्ली – वाहनाचे सुटे भाग तयार करणार्या भारत फोर्ज कंपनीच्या उपाध्यक्षपदी आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदी अमित कल्याणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब एन कल्याणी यांचे अमित कल्याणी हे पुत्र आहेत. (Amit Kalyani to become Vice-Chairman & Joint MD of Bharat Forge)
फोर्जच्या संचालक मंडळाची तीन एप्रिल रोजी बैठक झाली आणि या बैठकीत अमित कल्याणी यांची पूर्ण वेळ संचालक पदी फेरनियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी पुढील पाच वर्षे म्हणजे दहा मे 2029 पर्यंत राहणार आहे. अमित कल्याणी भारत फोर्ज मध्ये 1999 पासून सक्रिय आहेत.