मुंबई – सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गट दोघांकडूनही जय्यत तयारी करण्यात येत आहे. यावरून राजकारणही चांगलेच तापले आहे.
अशातच सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावरून राष्ट्रवादी कॉग्रेस आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले,’शिवाजी पार्कवर होणारा उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसला आंदण दिला आहे,” अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले,’मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या बीकेसीवर दसरा मेळावा पार पडणार आहे. यात मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत. यासाठी एकट्या सोलापूरातून 30 हजारापेक्षा जास्त शिवसैनिक मेळाव्यासाठी रवाना होणार आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा राष्ट्रवादीला – महाविकास आघाडीला आंदण दिला आहे.’ आणि बीकेसीच्या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने शिवसैनिक येणार आहेत. त्यामुळे आमचाच मेळावा रेकॉर्ड ब्रेक होईल.’ असेही ते म्हणाले आहे.