मुंबई – मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने आज सुनावणी केली आहे. न्यायमूर्ती एन. जे. जामदार यांनी सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर गेल्या आठवड्यात या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. यावर आज सुनावणी करण्यात आली असून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मनी लाँडरिंगप्रकरणी गेल्या वर्षी ता. 2 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर आज तब्बल अकरा महिन्यांनंतर त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे.