नवी दिल्ली – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकपूर्व मतदान सर्वेक्षण एबीपी सीव्होटरने जाहीर केले आहे. त्यानुसार भाजपा आसाम राखण्यात यशस्वी ठरेल. मात्र, लक्षवेधी ठरणाऱ्या प. बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस आपली सत्ता कायम राखणार असली तरी तेथे भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होईल, असे मानण्यात येत. तर केरळमध्ये डावे पक्ष सत्ता कायम राखतील असा अंदाज आहे. केरळमध्ये डाव्यांच वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपने योजना आखली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपने आधीच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. भाजपचा हा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.
केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. गेल्या आठवड्यात पक्षात दाखल झालेले ई-श्रीधनरन यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले आहे. ८८ वर्षांचे ई. श्रीधरन देशभरात मेट्रोमॅन म्हणून ओळखले जातात. भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून त्यांना केरळमध्ये भाजप मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार करणार अशा चर्चांना उधाण आले होते. आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
ई. श्रीधरन यांना धोरण ठरवणे आणि शहर नियोजन याचा 58 वर्षांचा अनुभव आहेत. श्रीधरन यांना मेट्रो प्रकल्प, रेल्वे, रेल्वे उड्डाणपूल याबद्दल केलेल्या कामासाठी मेट्रोमॅन म्हटलं जाते. याआधी त्यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आलं होतं. मात्र वयाचा विचार करता आपण तो प्रस्ताव नाकारू अस त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
केरळमध्ये डाव्यांची सत्ता असून काँग्रेस विरोधात आहे. भाजपने मागील काही वर्षांपासून केरळमध्ये ताकद लावली आहे. मात्र अद्याप त्यात यश आले नाही. आता श्रीधरण यांच्या मदतीने भाजपला किती फायदा होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.