नवी दिल्ली -विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुरूवारी येथे भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत महाराष्ट्र आणि हरियाणातील मुख्यमंत्री न बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. महाराष्ट्र आणि हरियाणात सरकार स्थापनेशी संबंधित निर्णय घेण्याचे सर्वाधिकार बैठकीत शहा यांना देण्यात आले. हरियाणात कुठल्याचा पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.
मात्र, भाजप त्या राज्यात सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. तर महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि इतर लहान पक्षांचा समावेश असणाऱ्या महायुतीने बहुमताचा आकडा पार केला आहे.