बीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार

अमृतसर : भारत-पाकिस्तान सीमेलगत शुक्रवारी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) केलेल्या कारवाईत एक पाकिस्तानी घुसखोर ठार झाला. ती घटना पंजाबच्या अमृतसर क्षेत्रात घडली.

सीमेलगत तैनात असणाऱ्या बीएसएफच्या सतर्क जवानांनी भारतीय हद्दीत एका घुसखोराने शिरकाव केल्याचे वेळीच हेरले. त्या घुसखोराच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला थांबण्याचा इशारा देण्यात आला. मात्र, घुसखोराने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. त्यात घुसखोर ठार झाला.

तो पाकिस्तानी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. जम्मू-काश्‍मीरबाबत भारताने धडक पाऊल उचलल्याने पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्याशिवाय, दहशतवादी संघटनाही बिथरल्या आहेत. त्यातून नापाक कारवाया घडवल्या जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सीमेलगत तैनात असणारी भारतीय सुरक्षा दले अधिक सतर्कता बाळगत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.