दौंड तालुक्‍यात प्रथमच उमलले कमळ

अटीतटीच्या लढतीत भाजपचे राहुल कुल यांचा निसटता विजय

दौंड – दौंड विधानसभा निवडणुकीच्या चुरशीच्या लढतीत अल्पमतात भाजपचे उमेदवार आमदार राहुल कुल यांना गड राखण्यात यश मिळाले आहे. कुल यांच्या विजयाने दौंड तालुक्‍यात प्रथमच कमळ फुलले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांनी कडवे आव्हान दिले. 2 लाख 12 हजार 467 मतदारांनी हक्क बजावला होता. मतमोजणीला गुरुवारी (दि.24) सकाळी शासकीय गोदामात सुरुवात झाली. पहिल्या फेरीत कुल यांनी आघाडी घेतली.

मात्र, त्यानंतर कुल यांची आघाडी कमी होत ती 20 व्या फेरीपर्यंत अवघी 525 मतांची आघाडी राहिली. या मतदार संघात एकूण 22 मतमोजणी फेऱ्या झाल्या. अखेरच्या कुल यांना निर्णायक 4 हजार 501 आणि थोरात यांना 4 हजार 314 मते मिळाली. या चुरशीच्या लढतीत 746 मतांनी कुल विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी जाहीर केले.

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे – 
राहुल सुभाषराव कुल (भारतीय जनता पक्ष)103664
रमेश किसनराव थोरात (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 102918
किसन बबन हंडाळ (बहुजन समाज पक्ष)939
अशोक किसन होले (बहुजन मुक्‍ती पक्ष)803
दत्तात्रय नामदेव ताम्हाणे (वंचित बहुजन आघाडी) 2633

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.