नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने दिल्ली महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेपासून घुमजाव केले असून त्यांनी आता अपक्षाला पाठिंबा देण्याऐवजी स्वत:चाच उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरसेवक रेखा गुप्ता यांना दिल्ली महापौरपदाच्या उमेदवार म्हणून उभे करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. उपमहापौरपदासाठी कमल बागरी तसेच स्थायी समिती सदस्य पदासाठी कमलजीत सेहरावत, गजेंद्र दारल आणि पंकज लुथरा यांचीही नावे जाहींर केली आहेत.
दिल्लीच्या 250 सदस्यांच्या महानगरपालिका सभागृहात आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. महापौरपदाची निवडणूक गुप्त मतपत्रिकेद्वारे घेतली जाते आणि या मतदानासाठी पक्षांतर विरोधी कायदा लागू नसल्यामुळे नगरसेवक कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्यास मोकळे असतात.
OBC Reservation : ‘या’ राज्यातही ओबीसी आरक्षणाशिवाय होणार स्थानिक निवडणूका
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सात लोकसभा खासदार आणि दिल्लीतील तीन राज्यसभा खासदार तसेच विधानसभेचे 15 आमदार मतदानासाठी पात्र आहेत. दिल्ली महापालिकेत दोन जण अपक्ष सदस्य असून कॉंग्रेसचे नऊ नगरसेवक आहेत.