मेलबर्न – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हीड वॉर्नर याने एका ऐतिहासिक कामगिरीला गवसणी घातली. त्याने आपल्या कारकिर्दीतील शंभारावी कसोटी खेळताना धुवाधार द्विशतकी खेळी केली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वैयक्तिक शंभराव्या कसोटीत द्विशतकी खेळी करणारा वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
#TestMatch | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलिया वरचढ; दुसऱ्या दिवसाअखेर १९७ धावांची आघाडी
या दोन संघात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी वॉर्नरने ही कामगिरी केली. या खेळीत वॉर्नरने 254 चेंडूत 16 चौकार व 2 षटकार फटकावताना 200 धावा केल्या. मात्र, लगेचच त्याला क्रॅम्प येऊ लागल्याने मैदान सोडावे लागले. नंतर द्विशतकी मजल मारली. शंभराव्या कसोटीत द्विशतक साकार करणारा वॉर्नर इंग्लंडच्या ज्यो रूट नंतरचा दुसराच फलंदाज ठरला. रूटने भारताविरुद्ध 2021 साली आपल्या शंभराव्या कसोटीत द्विशतक फटकावले होते.
#RanjiTrophy | युवा गोलंदाजाने ८ विकेट घेतल्या; विरोधी संघ अवघ्या ४९ धावांतच आटोपला
कांगारू फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या १००व्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर अशी कामगिरी करणारा तो १०वा फलंदाज ठरला आहे. त्याच वेळी, इतर ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत ज्यांनी ही कामगिरी केली आहे. रिकी पॉन्टिंगने हे काम वॉर्नरच्या आधी केले होते. या शतकासह वॉर्नरने सचिनच्या खास विक्रमाची बरोबरी केली आहे. सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके ठोकणारा तो फलंदाज ठरला आहे. सचिनने डावाची सुरुवात करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५ शतके झळकावली आहेत आणि वॉर्नरनेही अशीच कामगिरी केली आहे.
A double century for David Warner!
But his #OhWhatAFeeling jump comes at a cost! 😬#AUSvSA | @Toyota_Aus pic.twitter.com/RqJLcQpWHa
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2022
वॉर्नरने रबाडाच्या चेंडूवर चौकार मारला आणि आपले द्विशतक पूर्ण केले. यावेळी त्याने या खास कामगिरीच्या आनंदात जल्लोष साजरा केला. त्याने हवेत उंच उडी मारून प्रेक्षकांच्या दिशेने आपली बॅट फिरवली. मात्र. यादरम्यान त्याने उडी मारल्यानंतर त्याच्या पायाच्या शिरा ताणल्या गेल्या. त्याने जमिनीवर पाय टेकवल्यानंतर त्याला प्रचंड त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला मेडिकल टीम बोलावून मैदानाबाहेर नेण्यात आले.