भाजपचा येडियुरप्पांना धक्का; चिरंजीवांना मंत्रीमंडळात संधी नाहीच

बंगलुरू  – कर्नाटकातील बोम्मई मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून आज त्या मंत्रिमंडळात 29 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री हे पद ठेवण्यात आलेले नाही, तसेच माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या चिरंजीवांनाही संधी देण्यात आलेली नाही.

येडियुरप्पाचे चिरंजीव विजयेंद्र हे प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचा या मंत्रिमंडळात समावेश होईल अशी ग्वाही त्यांना श्रेष्ठींनी दिली होती असे वृत्त प्रसारीत झाले होते. मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले की काल रात्रीच पक्षश्रेष्ठींशी मंत्रिमंडळ रचनेविषयी सविस्तर चर्चा झाली आणि आज सकाळीच मंत्र्यांची यादी निश्‍चीत करण्यात आली.

येडियुरप्पांच्या मंत्रिमंडळात तीन उपमुख्यमंत्री होते पण यावेळी एकही उपमुख्यमंत्री असणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी शपथविधीपुर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दुपारी सव्वा दोन वाजता राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नवीन मंत्र्यांना राजभवनावर झालेल्या एका साध्या समारंभात अधिकारपदाची शपथ दिली. कर्नाटकच्या मंत्रिमंडळाची क्षमता 34 जणांची आहे त्यामुळे अजून अनेक मंत्र्यांना तेथे संधी मिळू शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.