नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीसोबतच दिल्ली महापालिकेतही मतदान होते आहे. या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष यांच्यात सरळ लढत होते आहे. आज भाजपने दिल्लीत प्रचाराचा धडाका लावला. त्याचवेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनिष सिसोदिया यांना जाहीर आव्हानही दिले.
Rajasthan Congress crisis : “गरज भासल्यास कठोर कारवाई करण्यास…” कॉंग्रेसची गेहलोत, पायलट यांना तंबी
सिसोदिया म्हणतात भारतीय जनता पार्टीने कोणती 10 कामे केलीत ती सांगावी. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांच्या पक्षाने दिल्लीत केलेली कोणतीही दोन कामे सांगावीत असे आव्हान नड्डा यांनी दिले. आपवर हल्लाबोल करताना ते पुढे म्हणाले की हिमाचल प्रदेशातील सर्व 67 जागांवर आपचे डिपॉझिट जप्त होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीतही हा पक्ष तोंडावर आपटणार आहे.
Rajasthan Congress crisis : “गरज भासल्यास कठोर कारवाई करण्यास…” कॉंग्रेसची गेहलोत, पायलट यांना तंबी
उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांमध्येही हा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. विजयी होणे दूरच त्यांना बहुतांश जागांवर आपले डिपॉझिटही वाचवता आले नव्हते. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत त्यांनी ज्या व्यक्तींना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवले होते ते लोकही भारतीय जनता पार्टीत सहभागी झाले. स्वत: केजरीवाल यांनी वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
तेथे त्यांनाही पराभव पाहावा लागला. दिल्लीत भाजपने गेलेल्या 15 वर्षांत केलेल्या कामांची यादीच त्यांनी यावेळी वाचून दाखवली आणि सिसोदिया यांनी त्यांच्या पक्षाने केलेली दोन कामे सांगावीत असे त्यांना खुले आव्हान दिले.
आज रविवारचा मुहुर्त साधत भारतीय जनता पार्टीचे तब्बल शंभर नेते दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. त्यांनी दिल्लीतल्या प्रत्येक घरात जाउन पक्षाचा प्रचार केला. 12 तास चाललेल्या या प्रचार अभियानातील 250 वॉर्डमधील प्रत्येक घराचे दार भाजपकडून ठोठावण्यात आले.