Himachal Pradesh Assembly Elections – हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. मागील काही दिवसांपासून देशातील जनतेचे लक्ष या दोन राज्यांच्या निवडणुकांकडे लागले होते. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वतःच्याच गुजरातमध्ये भाजपाला मोठी तयारी करवी लागली होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे भाजपने गुजरातेत सत्ता राखण्यात मोठे यश मिळवले. तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हिमाचल प्रदेशात काँग्रेसने सत्ताबदल घडवला आहे.
गुजरातच्या निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले “अनेक प्रकल्प एकाच राज्यामध्ये…”
हिमाचलच्या जनतेने एकाच पक्षाला सलग दोन वेळा सत्तेत बसू दिलेले नाही. त्याप्रमाणे या निवडणुकीत देखील तेच चित्र पाहायला मिळाले. असे असले तरी जनतेला त्यांच्या हिताचे सरकार कधीही नको नसते, त्यामुळे हिमाचलच्या जनतेने इतिहास राखण्यासाठी नव्हे तर काँग्रेसला पसंती दिल्याचे दिसत आहे. हिमाचलच्या ६८ विधानसभा जागांपैकी ४० जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर भाजपला २५ जागा मिळवता आल्या आहेत.
गुजरातच्या निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले “अनेक प्रकल्प एकाच राज्यामध्ये…”
हिमाचल प्रदेशाच्या निकालाबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “गुजरातच्या जनता जनार्दनचे आशीर्वाद भाजपसोबत आहेत. हिमाचलमध्ये इतक्या कमी फरकाने याअगोदर कधीही निकाल आलेले नाहीत. हिमाचल प्रदेशात आम्ही 1 टक्क्यांपेक्षा कमी मतांनी पराभूत झालो आहोत. त्यामुळे यापुढेही आम्ही हिमाचलशी संबंधित मुद्दे मांडत राहू”, असे पंतप्रधांनी म्हटले आहे.
गुजरातमध्ये भाजपाला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला या ठिकाणी मोठे अपयश आलेले आहे. विशेष म्हणजे, २०१७ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने गुजरातची निवडणूक चुरशीची केली होती. त्यावेळी काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र काँग्रेसच्या वाट्याला ६० जागा कमी आल्याचे दिसतंय.