BJP National Convention meeting 2024 – राजस्थान आणि छत्तीसगडची निवडणूक भाजपने जिंकली आहे आणि आता लवकरच तेलंगना आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार येईल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास आहे, असे राष्ट्रीय कार्यकारणीला संबोधित करताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले.
भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आजपासून दिल्लीत सुरवात झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला दीप प्रज्वलन करून सुरुवात केली. यावेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही उपस्थित होते. याशिवाय, महासचिव विनोद तावडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विजया रहाटकर, पंकजा मुंडे व्यासपीठावर उपस्थित होते. | BJP National Convention meeting 2024
जेपी नड्डा म्हणाले, मोदी देशाचे प्रमुख सेवक आहेत. ते देशाच्या कारभारात पूर्णपणे व्यस्त आहेत.परंतु असे असतानाही पक्ष वाढीकडे त्यांचे संपूर्ण लक्ष आहे आणि पक्षाच्या बाजूने उभे राहिले आहेत. पक्षाची प्रगती कशी होईल, पक्षाला पुढे कसे नेता येईल, याची चिंता पंतप्रधानांना प्रत्येक क्षणी सतावत असते. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. पंतप्रधानांनी 370 जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी काय काय करता येईल यावर विचार मंथन होणे आहे. | BJP National Convention meeting 2024
नड्डा म्हणाले की, भाजप हा आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे. 2014 पूर्वी केवळ 5 राज्यात भाजपची सरकारे होती आणि बराच काळ आम्ही 5-6 मध्ये अडकलो होतो. 2014 नंतर आज 17 राज्यात एनडीएची सरकारे आहेत आणि 12 राज्यात भाजपची सरकारे आहेत. | BJP National Convention meeting 2024
आम्ही संघर्षाचा काळ पाहिला
भारतीय जनसंघ आणि भाजपच्या सात दशकांच्या इतिहासातील प्रत्येक कालखंड आपण सर्वांनी पाहिला आहे.आम्ही संघर्षाचा काळ पाहिला, उपेक्षेचा काळ पाहिला. सुरक्षा वाचवण्यासाठी निवडणूक लढवण्याचा काळ पाहिला. आणीबाणी आपण पाहिली आहे. निवडणुकांमधील विजय-पराजयही आपण पाहिला आहे. पण आम्हाला आनंद आहे की पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेलेले दशक यशांनी भरलेले आहे, असेही नड्डा यांनी उपस्थितांना संबोधित केले.