उद्या सकाळी प्रकरणातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे आदेश
सर्व पक्षकारांना नोटीस जारी राजकीय चर्चेला उधाण
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच हा आज सर्वोच्च न्यायालयात पोहचला होता. त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी केली. राज्यातील सरकार स्थापनेचा पेच उद्यावर गेला आहे. तर दुसरकडे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे सकाळीच ‘सिल्व्हर ओक’वर शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. खासदार संजय काकडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
Maharashtra: BJP MP Sanjay Kakade arrives at NCP Chief Sharad Pawar’s residence in Mumbai. pic.twitter.com/xJgIRPKMdO
— ANI (@ANI) November 24, 2019