नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल यांनी आज भाजप आमदार विजेंदर गुप्ता यांना सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत म्हणजेच एक वर्षासाठी निलंबित केले आहे.
आदल्या दिवशी, गुप्ता यांनी अर्थसंकल्पातील तपशील लीक झाल्याबद्दल विशेषाधिकारांच्या उल्लंघनाची नोटीस दिली होती. यावर विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल म्हणाले होते की, “नियमानुसार अशी नोटीस तीन तास आधी देणे आवश्यक आहे. आता तुम्ही असेही म्हणत आहात की ती चर्चेसाठी घेण्यात यावी. यामागे गदारोळ माजवण्याचा उद्देश आहे असे दिसते. त्यामुळे सदनाचा वेळ वाया जातो असे नमूद करीत सभापतींनी गुप्ता यांना कडक ताकीदही दिली.
Maharashtra : “…लवकरच स्फोट होईल”, मंत्री भुसेंचं नाव घेत संजय राऊतांचं सूचक ट्वीट
आज दुपारी 2 नंतर सभागृह पुन्हा सुरू होताच, गुप्ता यांनी पुन्हा हाच मुद्दा उपस्थित केला, त्यानंतर आप आमदार संजीव झा यांनी त्यांची एक वर्षासाठी हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्यानुसार त्यांना वर्षभरासाठी निलंबीत करण्यात आले.