मुंबई – बॉलिवूडचा दमदार हिरो रणवीर सिंग शेवटचा सर्कस या चित्रपटात दिसला होता. जो सर्वसामान्यांना फारसा आवडला नाही.आता अभिनेत्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने प्रसिद्ध फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत अशी कृती केली आहे ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलाच ट्रोल करायला सुरुवात केली.
रणवीर सिंग आणि रोहनचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये फोटोग्राफर रोहन पापाराझींसमोर पोज देताना दिसत आहे. तेव्हा रणवीर सिंग मागून येतो आणि त्याला मजेशीर पद्धतीने लाथ मारतो. हे पाहून रोहनलाही खूप आश्चर्य वाटते आणि मग तो हसायला लागतो. रणवीरने केलेली ही मस्करी चाहत्यांना अजिबात रुचलेली नाही म्हणून त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
हा व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल होतोय. अनेकांनी आता रणवीरला फुकटचे सल्ले देखील द्यायला सुरुवात केली आहे.रणवीरला लाज वाटली पाहिजे अशी कमेंट एकाने या व्हिडिओवर केली आहे. तर दुसऱ्या एकाने ‘यामुळे याचे चित्रपट फ्लॉप होतात असं म्हंटल आहे.
View this post on Instagram
रोहन श्रेष्ठ हा सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरचा एक्स बॉयफ्रेंड आहे. दोघांनी जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केले होते, पण 2022 मध्ये दोघे वेगळे झाले. त्यांच्या ब्रेकअपमागचे कारण उघड झाले नाही. श्रद्धा आणि रोहन लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. दोघांचेही कुटुंबियांशी चांगले संबंध आहेत. असे म्हटले जाते की, श्रद्धाच्या कुटुंबाला रोहन खूप आवडतो. अनेकदा या दोघांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या समोर आल्या होत्या.