नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आता न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रावर जोरदार हल्ला चढवणे सुरू केले आहे. हे वृत्तपत्र भारताविषयी खोटी माहिती प्रसारीत करीत आहे, असा आरोप माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने भारताविषयी काहीही प्रकाशित करताना तटस्थतेचे सर्व ढोंग मागे टाकले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. काश्मिरातील वृत्तपत्र स्वातंत्र्यावर सरकारने निर्बंध लागू केले असल्याचे मत काल्पनिक आहे. भारत आणि त्याच्या लोकशाही संस्थांबद्दल अपप्रचार करण्याच्या एकमेव हेतूने हे लिखाण न्यूयॉर्क टाइम्सने प्रकाशित केले आहे, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
Delhi excise policy case : ईडीने जबरदस्तीने जबाब नोंदवून घेऊन त्यावर स्वाक्षऱ्या घेतल्या…
विदेशी मीडिया भारताबद्दल आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल खोटे पसरवत आहेत. अशा खोट्या गोष्टी फार काळ टिकू शकत नाहीत,असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, भारतातील वृत्तपत्र स्वातंत्र्य हे इतर मूलभूत अधिकारांइतकेच पवित्र आहे.