Delhi excise policy case : ईडीने जबरदस्तीने जबाब नोंदवून घेऊन त्यावर स्वाक्षऱ्या घेतल्या…

नवी दिल्ली – दिल्लीच्या दारू घोटाळा प्रकरणात ईडीने जबरदस्तीने आपला जबाब नोंदवून घेऊन त्यावर दबाव आणून स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. आपल्याला तो जबाब मागे घ्यायचा आहे, अशी मागणी आरोपी अरुण पिल्लाई याने कोर्टात केल्याने ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोर्टानेही या प्रकरणाची दखल घेत ईडीला त्यांचे म्हणणे सादर करण्याची नोटीस दिली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला अरुण पिल्लाई हा हैदराबादचा एक व्यावसायिक आहे. त्याने आम आदमी पक्षाच्या नेत्यांना दारूच्या ठेक्यासाठी शंभर कोटी रुपये दिले होते असा सीबीआयचा दावा आहे.
#MahaBudget2003 : जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय? अजित पवारांचा संतप्त सवाल
पण पिल्लाई याने हा दावा खोडून काढला आहे. त्याने म्हटले आहे की, आपल्याकडून हा जबाब खोटेपणाने लिहून घेण्यात आला आहे जो आरोप केला जात आहे तसे काहीही घडलेले नाही असे त्याचे म्हणणे आहे. याच प्रकरणात सीबीआय व ईडीने मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे.





