राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला भाजप नेत्यांची दांडी

एक गट नाराज असल्याची चर्चा

मुंबई – भाजपच्या मुंबईतील राज्य कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यभरातील अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.

मात्र या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दांडी मारल्याचे दिसून आले.
तसेच गडकरी गटाचे राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार पहिल्या सत्रात गैरहजर होते. दुसऱ्या सत्रात राजकीय ठराव मांडण्यासाठी मुनगंटीवार सहभागी झाले. मंत्री पंकजा मुंडेही आजच्या बैठकीला अनुपस्थित आहेत. वैयक्तिक कारणांसाठी परदेशात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पंकजा यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत असून त्या गैरहजर आहेत.

यावर चंद्रकांत पाटी म्हणाले, गडकरीजी, सुधीरभाऊ, पंकजाताई अनुपस्थित असल्याची बातमी सुरु आहे. सुधीरभाऊंची तब्येत ठीक नसल्याने ते उशिरा आले आहेत. इतरांनी अनुपस्थितीबाबत पूर्व कल्पना दिली होती. आता सुधीरभाऊ राजकीय प्रस्ताव मांडायला दुसऱ्या सत्रात आले आहेत. त्यामुळे ते सुद्धा दाखवावे अशी विनंती आहे, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्षांच्या उपस्थितीत राज्यातील ही शेवटची कार्यसमितीची बैठक आहे. यामुळे सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे एक गट नाराज असल्याची कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कार्यक्रम आखला आहे. विधानसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी महिनाभर मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा निघणार आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही महाजनादेश यात्रा काढणार काढणार आहेत. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यभर भाजपची महाजनादेश यात्रा निघणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)