पणजी – निवडणूकांच्या तोंडावर येथील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आज एक मोठा दणका बसला. या पक्षाचे नेते व विद्यमान मंत्री मायकेल लोबो यांनी राज्यातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी पक्षातूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय जनता पक्ष आता सामान्य माणसांचा पक्ष राहिलेला नाही असा आरोप त्यांनी केला आहे. ते कलंगुट विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत. त्यांनी आज विधानसभेच्या सभापतींकडे आपले राजीनामा पत्र सादर केले.
तसेच पक्षाचा राजीनामाही त्यांनी प्रदेश भाजप अध्यक्षांकडे पाठवून दिला आहे. आपल्या भविष्यातील राजकीय कृतीचा आपण अजून निर्णय घेतलेला नाही असे त्यांनी म्हटले आहे.
तथापि काहीं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत असे सांगण्यात येते. अन्यही काही पक्षांशी त्यांची चर्चा सुरू आहे असेही सांगण्यात येत आहे.