पणजी – गेल्या पाच वर्षात गोव्यातील 60 टक्के आमदारांनी पक्षांतर केल्याचा प्रकार घडला आहे. हा एक विक्रम आहे असे द असोशिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
गोव्यातील विधानसभा 40 सदस्यांची आहे त्यातील 24 आमदारांनी गेल्या पाच वर्षांत पक्षांतर केले आहे. एकाच टर्म मध्ये 60 टक्के आमदारांनी पक्ष बदल केल्याची घटना देशातील अन्य कोणत्याही विधानसभेत घडलेली नाही. गोव्यात सत्ताप्राप्तीची ही हाव लोकप्रतिनिधींच्या नैतिकता आणि लोकशाहींशिस्तीवर मात करणारी ठरली आहे असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
गोव्यातील दहा कॉंग्रेस आमदारांनी सन 2019 मध्ये पक्षांतर करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला ंहोता. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे दीपक पाऊसकर, आणि मनोहर आजगांवकर या आमदारांनीही भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्याखेरीज जीएफपी पक्षाचे जयेश साळगांवकर,कॉंग्रेसचे रवि नाईक यांनीही अलिकडेच पक्षांतर केले आहे. लुईझिन्हो फालेरा, चर्चील आलेमाव यांनी तृणमुल कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.