भाजपने भल्या भल्यांना घरी बसविले आहे

संग्रहित छायाचित्र....

माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकरांचा खा. रणजितसिंहांना इशारा

गोरे, देसाई माझे काम करतील

आगामी काळात आ. जयकुमार गोरे भाजपमध्ये आले तर तुमची भूमिका काय असेल, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला. त्यावर येळगावकर म्हणाले, आले तर येऊ द्या… बघतो. तर भाजपने तुम्हाला उमेदवारी दिली तर शेखर गोरे व अनिल देसाई तुमचे काम करतील का, असे जेव्हा पत्रकारांनी विचारले त्यावर येळगावकर म्हणाले, देसाई माझे सहकारी आहेत.

सातारा – निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून जर किंमत नसणाऱ्यांना सोबत घेऊन फिराल, तर भाजपने भल्या भल्यांना घरी बसविले आहे हे ध्यानात ठेवा, असा इशारा माजी आमदार डॉ.दिलीप येळगावकर यांनी नवर्निवाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिला आहे. त्याचबरोबर माणमध्ये गोरे बंधूनी पाठिंबा देऊनदेखील रणजितसिंह निंबाळकरांचे मताधिक्‍य कमी का झाल, असा प्रश्‍न येळगावकर यांनी उपस्थित केला.

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी भाजपचे माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ, खटाव तालुकाध्यक्ष विपुल शहा, ऍड. विलास आंबेकर, रमेश जाधव, चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते. येळगावकर म्हणाले, “”रणजितसिंह निंबाळकर यांनी माण तालुक्‍यातील दुष्काळी दौऱ्याचे नियोजन रविवारी केले. मात्र, माण तालुक्‍यातील भाजप नेत्यांना नियोजनाचा मेसेज सोमवारी सकाळी पाठविण्यात आला. निंबाळकर हे मतदारसंघातील स्थान डळमळीत झालेल्या कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांना घेऊन दुष्काळी दौरा करत आहेत. निंबाळकर यांनी आता मित्रप्रेम बाजूला ठेवले पाहिजे.

निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेण्याऐवजी गोरे यांना सोबत घेवून फिरणार असतील तर पक्षाने भल्या भल्यांना घरी बसविले आहे, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. तसेच निवडणुकीच्या शेवटच्या तीन दिवसांत निंबाळकर यांचे वागणे धक्कादायक होते. पोलींग एजंट फॉर्म, मतदार यादी आम्हाला दिली गेली नाही.

मतदारांना आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था देखील केली नाही. त्याबाबत निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावर पोलींग एजंट फॉर्म आमदार गोरे यांच्याकडे दिले असल्याचे सांगितले. एकूणच निंबाळकरांची माण तालुक्‍यातील मतदान यंत्रणा आमदारांनी यांनी हायजॅक केली होती. अखेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी इतर उमेदवारांचे पोलींग एजंट फॉर्म भरून बुथवर प्रामाणिकपणे काम केले. मात्र, रणजितसिंहांचे वागणे ते माझे काम निश्‍चितपणे करतील. त्याचबरोबर सन 2014 च्या निवडणुकीत मी त्याग करून शेखर गोरे यांचे काम केले. त्यामुळे यावेळी शेखर गोरेसुद्धा माझे काम करतील, असे स्पष्टीकरण येळगावकर यांनी दिले.बरोबर नाही. त्यांना राजकारणात अजून भरपूर वाव आहे. त्यांचे वडिल माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांना दोन निवडणुकीत खटावमधून कायम मताधिक्‍य देण्याचे काम केले. कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतरही हिंदूराव नाईक निंबाळकरांनी भाजप-सेना कार्यकर्त्यांशी कधी दुजाभाव केला नाही.”

माण- खटाव मतदारसंघातून निंबाळकर यांना 23 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. त्यापैकी केवळ तीन जिल्हा परिषद गट असलेल्या खटाव तालुक्‍याने दहा हजारांचे मताधिक्‍य दिले आहे. तर माण तालुक्‍यात 5 जिल्हा परिषद गट, प्रत्येकी एक नगरपंचायत व नगरपरिषद असून देखील केवळ 13 हजारांचे मताधिक्‍य मिळाले आहे. विशेषत: आमदार गोरे, शेखर गोरे यांनी पाठिंबा देवून आणि भाजप-सेना व मित्र पक्षांनी काम करून देखील माण तालुक्‍यातून एवढे कमी मताधिक्‍य कसे मिळाले ? आंधळी, बिदाल सारख्या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीला एवढी मते कशी मिळाली? असा प्रश्‍न उपस्थित करून येळगावकर म्हणाले, “”वास्तविक आमदार गोरे यांनी निंबाळकर यांना पाठिंबा दिल्याचा बनाव निर्माण केला. त्यांचा तिसरी आघाडी स्थापन करण्याचा डाव फसला तसेच त्यांच्यावर नवी मुंबईमध्ये दहा लाख रूपयांचा खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या सर्वातून वाचण्यासाठी त्यांनी पाठिंबा देण्याचा बनाव निर्माण केला आहे.

आमदार गोरे यांची मतदारसंघावरील पकड ढिली झाली आहे. त्यांनीच नियुक्त केलेले कॉंग्रेसच्या दोन्ही तालुकाध्यक्षांसह अनेक जण त्यांना सोडून गेले आहेत. आमदारांनी मतदारसंघाची अब्रू घालवली आहे. दहा वर्षात एक मोठा प्रकल्प मतदारसंघात ते आणू शकले नाहीत. माण तालुक्‍याच्या क्रिडा संकुलासाठी त्यांना जागा मिळत नाही. उलट मी खटाव तालुक्‍याच्या क्रिडा संकुलाचा प्रश्‍न मार्गी लावला. राज्यात सोलर निर्मितीमध्ये माण तालुका दुसऱ्या क्रमांकावर असताना नव्याने एकही प्रकल्प माणमध्ये येऊ शकला नाही. अशी सर्व परिस्थिती असून येत्या काळात आमदार गोरे यांचा पर्दाफाश केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा येळगावकर यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)