वाघोली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला ७ वर्ष पुर्ण झाल्याचा वर्धापन दिन मांजरी बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांनी दिली.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित गरजूंना अन्नदान करण्यात आले. केंद्रातील सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याचा वर्धापनदिन सेवा कार्यानी संबंध देशात साजरा होत असताना करोनाच्या संकटाच गांभीर्य पाहता शहराध्यक्ष माजी आमदार जगदिश मुळीक, पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश कार्यकारिणी सदस्य रोहीदास उंद्रे पाटील यांच्या नेतृत्वात आणि जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, सरचिटणीस धर्मेंद्रजी खांडरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मांजरी खुर्द तालुका हवेली मधील उसतोडणी कामगार आणि निराधार अशा २५० लोकांना भाजपयुमो पुणे आणि रोहीदासशेठ उंद्रे युवा मंचच्या माध्यमातुन अन्नदान करण्यात आले.
याप्रसंगी भाजयुमो पुणे शहर उपाध्यक्ष स्वप्निल उंद्रे,मांजरी खुर्दचे सरपंच महादेव उंद्रे, वाघोली नगर संपर्क प्रमुख अशोकजी सातव, ग्रां.पं सदस्य निखिलची उंद्रे हिरामण गवळी, माऊली उंद्रे, प्रतिक भोसले, संदीप उंद्रे, दत्ता म्हस्के, संतोष सोनबा उंद्रे, अक्षय काळे व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.