मुंबई – करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलं आहे. सर्वच क्षेत्राला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला आहे. अनेक क्रिकेटपटूंनी करोनामुळं आपले नातलग गमावले आहेत. त्यातच आता भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांच्या आईची तब्येत गंभीर आहे.
भुवनेश्वरच्या आई इंद्रेश यांना शनिवारी रात्री बुलंदशहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असून सध्या ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
भुवनेश्वर कुमार यांच्या आईला 3 मे रोजी करोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना घरीच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. 12 मे रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, तरीही तब्येतीमध्ये कोणीती सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर 21 मे रोजी त्यांचा पुन्हा एकदा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
याआधी भुवनेश्वर कुमारचे वडिल किरणपाल सिंह यांचे 20 मे रोजी कॅन्सरमुळे निधन झाले होते. ते 63 वर्षांचे होते. किरणपाल सिंह हे उत्तर प्रदेश पोलीस सेवेत कार्यरत होते.