नवी दिल्ली: भाजपने १७ राज्यांमध्ये होणाऱ्या 64 विधानसभा जागांसाठी आणि २१ ऑक्टोबरला केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या पोट-निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 32 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने कर्नाटकात १५ जागा, उत्तर प्रदेशात ११ जागा, केरळ आणि बिहारमध्ये प्रत्येकी पाच जागा, गुजरात, आसाम आणि पंजाबमधील प्रत्येकी चार जागा, सिक्कीममधील तीन जागा, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि राजस्थानमधील प्रत्येकी दोन जागा घेतल्या आहेत. आणि अरुणाचल प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, मेघालय, ओडिशा आणि पुडुचेरी या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. याचा निकाल 24 ऑक्टोबरला येईल.
The Central Election Committee has decided the following names for the ensuing Bye-Elections to the Legislative Assembly Constituency of different States. pic.twitter.com/f4VCsqBIxm
— BJP (@BJP4India) September 29, 2019
दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. यामध्ये हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अजेंड्यावर आहेत. आज भाजपा महाराष्ट्रासाठी पहिली यादी जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, कार्यवाह अध्यक्ष जेपी नड्डा आणि अन्य ज्येष्ठ नेते या बैठकीला हजर असतील.