बहुप्रतिक्षित असलेल्या “बंदिश बॅंडिट्स’चा अखेर ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ही एक म्युझिकल ड्रामा सिरिज असून निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच त्याचा टीझर प्रदर्शित केला होता. त्यानंतर हा उत्साह कायम ठेवत नसीरुद्दीन शाहला वाढदिवसाची खास भेट देत आज हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरने सोशल मीडियावर एकच धम्माल केली आहे.
View this post on Instagram
या ट्रेलरच्या सुरुवातीला तमन्ना दिसते जी एक उभरती पॉप सेंसेशन आहे आणि ती आपला मित्र राधेकडे धावत जाताना दिसते. राधे हा एक गायक असून तो आपल्या आजोबांच्या शास्रीय संगीतात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू इच्छित आहे. या दोघांच्या गाठी-भेटी होतात आणि ते प्रेमात पडतात. परंतु दोघांचा वारसा वेगळा असला तरी संगीत त्यांच्यातील दुवा असतो.
दहा भागांच्या या सीरिजमध्ये रितिक भौमिक आणि श्रेया चौधरीसोबत नसीरुद्दीन शाह, अतुल कुलकर्णी, कुणाल रॉय कपूर, शीबा चढ्ढा आणि राजेश तैलंग आदी कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत. “बंदिश बॅन्डिट्स’मध्ये एक रोमांचक मूळ साउंडट्रॅक आहे, जो प्रसिद्ध म्युझिकल त्रिकूट शंकर-एहसान-लॉय द्वारा रचित आहे. या सिरिजमधून ते डिजिटल डेब्यू करत आहेत. ही सिरिज पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे.