दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला

बेल्हे – साकोरी (ता. जुन्नर) येथील सोमनाथ दगडू पानसरे (वय 27) या तरुणावर दुचाकीवरून जात असताना शनिवारी (दि. 11) रात्री साडेनऊ वाजता अचानक बिबट्याने हल्ला केला. यात गाडीवरून पडल्याने यांना गंभीर दुखापत झाली आहे.

सोमनाथ पानसरे हे कामावरून रात्री साडेनऊ वाजता साकोरी-पानसरे रस्त्यावरून दुचाकीवरून घरी जात असताना शेजारी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पानसरे यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने बिबट्याचा हल्ला फसला. मात्र पानसरे हे दुचाकीवरून खाली पडले.

बिबट्याने त्यांना कोणतीही दुखापत केली नसली तरी गाडीवरून पडल्याने पानसरे यांच्या डोक्‍याला व पायाला जबर मार लागला. त्यांना ताबडतोब निमगाव सावा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बेल्हे वनपाल दत्ता फापाळे यांनी घटनास्थळी ताबडतोब भेट देऊन सोमनाथ पानसरे यांची विचारपूस केली.

Leave A Reply

Your email address will not be published.