Bipasha Basu : अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिने 2016 मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले होते. त्यानंतर 2022 मध्ये बिपाशा आणि करण आई- बाबा झाले. अनेकदा दोघे मुलगी देवीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. बिपाशा आणि करणची मुलगी एक वर्षाची झाली आहे. त्यानिमित्त त्यांनी देवीचा पहिला वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला आहे. बिपाशा आणि करने देवीचा पहिला वाढदिवस आणि दिवाळी मालदीवमध्ये साजरी केली.
मालदीवमधील काही फोटो आणि व्हिडिओ बिपाशाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. देवीच्या वाढदिवसानिमित्त मालदिवमधील एका ठिकाणी गुलाबी फुगे आणि फुलांच्या पाकळ्यांनी सुंदर सजावट करण्यात आली आहे.अभिनेत्रीने आणखी एक व्हिडिओ पोस्ट शेअर केला आहे, ज्यात तिच्या परदेशात दिवाळी साजरी करण्यात आली आहे. त्यांची मुलगी देवी तिच्या हातात काही फुले धरून आहे. देवीने टेबलावर ठेवलेल्या मूर्तींना ही फुले अर्पण केली. व्हिडिओ शेअर करत बिपाशा बसूने लिहिले की, ‘मालदीवमध्ये देवीची दिवाळी पूजा.’
View this post on Instagram
बिपाशाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत. सोशल मीडियावर बिपाशा बसू आणि पती करण सिंग ग्रोव्हरचे चाहते त्यांची मुलगी देवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आलिया भट्टची मुलगी राहा देखील एक वर्षाची झाली आहे. यानिमित्त आलियाने सोशल मीडियावर खास वाढदिवसाचे खास फोटो शेअर केले होते.