Bill Gates: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असलेले बिल गेट्स सध्या भारतात आहेत. बिल गेट्स हे त्यांच्या साध्या राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे. बिल गेट्स यांना महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध डॉली चायवाल्याची भुरळ पडली. एका डॉली चायवाल्याकडे त्यांनी चहा घेतला. त्यांचा हा व्हिडिओ पाहून सर्वचजण चकित झाले आहे.
बिल गेट्स यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बिल गेट्स हे डॉली चायवाला या नावाने प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या चहा विक्रेत्याच्या स्टॉलवर असल्याचे दिसते. ते त्याच्या हातच्या खास चहाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. त्यांच्या या ‘चाय पे चर्चा’चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यात ते चहा विक्रेत्याला ‘एक चहा प्लीज’ असे म्हणताना दिसतात. तेव्हा चहा विक्रेता त्यांना स्टाईलमध्ये गरम चहा देतो. यानंतर बिल गेट्स चहाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. बिल गेट्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
कोण आहे ‘डॉली चायवाला’ ?
बिल गेट्स ज्या चहा विक्रेत्याकडून चहा घेतात त्याचे नाव सुनील पाटील आहे. तो ‘डॉली चायवाला’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या खास स्टाइलमुळे तो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. डॉली नागपूरमध्ये चहा विकतो. त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले, त्यानंतर त्याने शिक्षण सोडले. नागपुरातील सिव्हिल लाईन परिसरात गेल्या 16 वर्षांपासून तो चहाचे दुकान चालवतात. त्याची चहा बनवण्याची पद्धत लोकांना आवडते. फूड व्लॉगर्स त्यांचे व्हिडिओ बनवण्यासाठी दूरवरून येतात.
रजनीकांत स्टाईलमध्ये चहा विकण्याची पध्दत
डॉली चायवाला साऊथ सुपरस्टार रजनीकांतच्या स्टाईलमध्ये चहा देत असल्याने लोकप्रिय झाला आहे. तसेच डॉलीचा पोशाखही अगदी वेगळा आहे. त्याची ड्रेसिंग स्टाइल सामान्य माणसांपेक्षा वेगळी आहे. त्याची हेअर स्टाइलही हटके असल्याने सध्या प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. सोशल मीडियावर देखील त्याच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे.