Arvind Kejriwal ।मुख्यमंत्री अरविद केजरीवाल निवडणुकीत राजकीय प्रयोग करतांना दिसतात. ते निवडणुकीत राजकीय प्रयोग करण्यासाठी ओळखले जातात. या राजकीय प्रयोगाचा सकारात्मक परिणामही बघायला मिळतो. भाजप पक्षही तिकीट वाटप करतांना बोल्ड स्टेप उठवताना दिसते. तर काँग्रेस अनेकदा निवडणुकांमध्ये राजकीय प्रयोग करण्याची चर्चा करतात मात्र तसे करतांना दिसत नाही.
अशात लोकसभा निडणुकीसाठी सर्व पक्षांनी रणनीती आखलेली दिसत आहे. पक्षांनी उमेदवारांची यादीही फायनल केली आहे, अशात आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी लोकसभेचे तिकीट दिलेल्या एक उमेदवारीची चर्चा सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी जनरल कैटेगरी ईस्ट दिल्लीतून उमेदवार कुलदीप कुमार यांना उमेदवारी देऊन केजरीवाल यांनी पुन्हा एकदा राजकीय खेळी केली आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आप युती करत निवडणूक लढणार आहे. यातील चार जागा आपकडे आहे. यातील ईस्ट दिल्ली सीट साठी आपने स्वच्छता कर्मचाऱ्याच्या मुलाला तिकट दिले आहे. या उमेदवाराचे नाव कुलदीप कुमार आहे. यांना उमेदवारी देत पुन्हा एकदा आप पक्षाने मतदान करणाऱ्या जनतेला आकर्षित केले आहे. या उमेदवाराला तोड देणारा उमेदवार शोधणे विरोधी पक्षाला कठीण आहे.
कुलदीप कुमारचे केजरीवाल यांनी केले कौतुक
‘तो एका स्वच्छता कर्मचाऱ्याचा मुलगा आहे आणि गरीब कुटुंबातून आला आहे. समाजासाठी काम करणारा तो मुलगा आहे. तुम्ही रात्री 12 वाजता फोन केला तरी ते तुमचे काम करण्यासाठी तुमच्या घरी पोहोचतील. मी त्याचे खूप कौतुक ऐकले आहे. मला आशा आहे की सर्वजण आमच्या पावलाचे स्वागत करतील. समाजातील सर्व स्तरातील लोकांचे आशीर्वाद आम्हाला लाभतील आणि आमचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील.’
यापूर्वी पंजाबमध्ये केला होता प्रयोग
केजरीवाल म्हणाले की, ‘ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने एससी समुदायातील कुलवंत सिंग यांना मोहालीच्या सर्वसाधारण गटातून उमेदवारी दिली होती. आणि मोहालीच्या जनतेने त्यांना विजयी करून आमदार केले होते.’
हेही वाचा
Akshay Kumar । ‘या’ माजी क्रिकेटरचा पत्ता कट करून अक्षय कुमार लोकसभेच्या मैदानात ?