पाटणा – बिहारमध्ये दारू बंदी आहे. सरकारने अमलात आणलेल्या या कायद्याचे पालन करने आणि ते सर्वसामान्य जनतेकडून करवून घेण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. मात्र कधी कधी पोलिसच हातात दारूचे ग्लास घेतलेल्याचे दिसतात. त्यांच्या अश्लील कृत्यांचे व्हिडिओही समोर येत असतात. दरम्यान, दारू पिऊन बारबालासोबत मौजमजा केल्याने पोलिस अधिकाऱ्याला आपले पद गमवावे लागले आहे.
सदरचे ठाणेदार जयशंकर प्रसाद यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते कुठेतरी समुद्राजवळ बसून दारू पीत आहेत. इतकेच नाही तर या पोलीस अधिकाऱ्याचा बारबालासोबत नृत्य करतानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. याला कर्तव्यशून्यता आणि अनुशासनहीनता असल्याचे सांगून एसपी लिपी सिंह यांनी पोलीस स्टेशन प्रभारी जयशंकर प्रसाद यांना तत्काळ निलंबित केले आहे. व्हायरल फोटो आणि व्हिडिओची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी एसडीपीओला दिले आहेत.