Bihar : बिहारच्या नवादामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाची दिवसाढवळ्या भररस्त्यात चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. या तरुणावर तब्बल ३० वेळा वार करण्यात आले. परंतु, तरीही त्याला वाचवण्याकरता आजूबाजूला असणाऱ्या एकानेही पुढाकार घेतला नसल्याने परिणामी या मुलाचा मृत्यूचा झाला. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
बिहारमधील नवादा जिल्ह्यात ही घटना घडली असून पोलिसांनी तपास सुरू करून आरोपींचा शोध सुरू आहे. व्हिडिओमध्ये पीडित तरुणावर चाकूने वार करत असलेल्या आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित कॉन्स्टेबलचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Boy dies after he was stabbed 30 times in Bihar’s Nawada. He was identified as Rahul Kumar.
Efforts were on to identify the accused. #Bihar #CCTV #CCTVFootage #ViralVideo #Video pic.twitter.com/0EPwf2itXF
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) December 9, 2023
आरोपी तरुणाला चाकूने बेदम मारत असताना त्यांच्या बाजूने कार, बाईक आणि बस धावत आहेत. परंतु, एकानेही हा हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे, असं या व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे. एवढंच नव्हे तर एक माणूस या घटनेकडे शांतपणे पाहतानाही दिसत आहे.
या घटनेने बिहार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. बिहारमध्ये एका महिन्याच्या कालावधीत अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. २ डिसेंबर रोजी बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एका बिहार सरकारी शाळेतील शिक्षकाचे अपहरण करण्यात आले आणि तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्यात आले. २९ नोव्हेंबर रोजी फुलकोबी चोरल्याप्रकरणी ५० वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली होती. त्याच दिवशी स्कूल व्हॅन चालकाने दोन नर्सरीच्या विद्यार्थ्यांना घरी सोडत असताना त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना बेगुसराय येथे घडली.