Vidyut Jammwal : अभिनेता विद्युत जामवालने (Vidyut Jammwal) त्याचे न्यूड फोटोशूट सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केले आहे. सध्या त्याच्या या फोटोंवरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यापूर्वी अभिनेता रणवीर सिंहने देखील न्यूड फोटोशूट केले होते. यावरून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता विद्युत जामवालने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याने शेअर केलेली ही पोस्ट पाहून त्याची तुलना रणवीर सिंहसोबत केली जात आहे.
विद्युत जामवालने न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. एका फोटोमध्ये तो जंगलात नदीच्या काठावर बसलेला दिसतोय, तर एका फोटोत तो नदीत आंघोळ करताना दिसत आहे. एका फोटोंमध्ये विद्युत जामवाल चहा बनवताना दिसत आहे. या सर्व फोटोंमध्ये विद्युत जामवाल कपड्यांशिवाय दिसत आहे. त्याचे हे फोटो स्थानिक मेंढपाळ मोहर सिंगने काढले असल्याचे विद्युतने सांगितले आहे.
विद्युतने पोस्ट करत लिहिले की, ‘हिमालय पर्वत रांगेत मी परतलो. ‘देवाचे निवासस्थान’. 14 वर्षांपुर्वी हे सुरू झालं. माझ्या लक्षात येण्याआधीच… दरवर्षी 7-10 दिवस एकटे घालवणे हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला. लक्झरी आणि आनंदाच्या जीवनातून जंगलात येताना, मला माझा एकटेपणा शोधायला आवडतो आणि “मी कोण नाही” हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर सर्वात कंफर्टेबल आहे आणि मी निसर्गाच्या नैसर्गिक फ्रिक्वेन्सीमध्ये ट्यून करतो.”
View this post on Instagram
पुढे त्याने लिहिले की, “मी घरी परत येताना हवी असलेली उर्जा इथेच निर्माण करतो, माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय अनुभवण्यासाठी इथेच मी तयार होतो. मी आता माझ्या पुढच्या अध्यायासाठी तयार आणि उत्सुक आहे. CRAKK 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. ” या पोस्टद्वारे त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे.
दरम्यान, विद्युत जामवालने आतापर्यंत ‘बुलेट राजा’, ‘कमांडो’, ‘कमांडो 2’ आणि ‘कमांडो 3’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. जबरदस्त अॅक्शन आणि खतरनाक स्टंटमुळे विद्युतची मनोरंजन विश्वात वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.